आरोंदा येथे “उमळात रस्ता रोखुन बसलेल्या पट्टेरी वाघाचे दर्शन
*नागरिकांमध्ये घबराट; वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी*
सिंधुदुर्ग
गोवा येथे जात असताना चार चाकी समोर आरोंदा येथे “उमळात” या ठिकाणी काल रात्री ८:३० वाजता भल्या मोठ्या वाघाचे दर्शन घडले. गाडीची हेडलाईट पडली तरी हा वाघ तब्बल दहा मिनिटे रस्ता रोखून होता. काही वेळाने या वाघाने आपले नैसर्गिक अधिवासात प्रयाण केले. गोवा येथे केरी ला जाणाऱ्या पर्यटकानी वाघ नैसर्गिक अधिवासात गेल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला व पुढील प्रवासास मार्गस्थ झाले. मानवी वस्तीत असा वाघाचा मुक्त संचार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची प्रकर्षाने नोंद घेणे आवश्यक आहे.