*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अभंग रचना*
*अनाथांची माय सिंधुताई*
अनाथांची माय
माय अनाथांची/पाजे प्रेमपान्हा/
यशोदेचा कान्हा/लेकरे ती//
भरविला घास/कूस उबदार/
मायेचा पाझर/ त्यांच्या वरी//
अनंत संकटे/जीवनात आली//
वादळात झाली/दीपस्तंभ//
जगणे जाहले/चंदनासमान/
अत्युच्च सन्मान/कार्यास्तव//
कृतीशील कार्य/केलेस निस्वार्थ/
आयुष्यात अर्थ/ गवसला//
अमोघ ती वाणी/अभंग ओठात/
काव्याच्या जगात /रमलेली//
वात्सल्याचा सिंधू/ देवाघरी गेला/
मनात उरला/ आर्त टाहो//
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🥀
*अरूणा दुद्दलवार✒️🙏*
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏