You are currently viewing गतिरोधकाला कट मारण्याचा नादात दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू 

गतिरोधकाला कट मारण्याचा नादात दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू 

गतिरोधकाला कट मारण्याचा नादात दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू

कणकवली गडनदी पुलावरील नाईक एंटरप्राइजेससमोरील घटना

कणकवली :

येथून वागदे च्या दिशेने जात असताना नाईक एंटरप्राइजेस च्या समोर सर्व्हिस असलेल्या गतिरोधकावर गुरुवारी रात्री ९:३० वा. च्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात कणकवली पिळणकरवाडी येथील संजोग श्रीधर सावंत ( रा. कणकवली पिळणकरवाडी वय – ३६ ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अपघातात मृत झालेला संजोग सावंत त्यांचा मित्र महेश गंगाराम चौगुले यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी ( एम एच ०७ झेड ०७७१) घेऊन वागदे च्या दिशेने निघाले होते. दुचाकीवर एकूण तिघेजण होते. यातील तिसऱ्या व्यक्तीचे नाव समजले नाही. मात्र जेव्हा दुचाकी गडनदी पुलानजिक नाईक एंटरप्राइजेस जवळ सर्व्हिस रस्त्यावर आली तेव्हा तेथे असलेल्या गतिरोधकाला कट मारून जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुचाकीस्वार महेश चौगुले यांचा प्रयत्न फसला आणि दुचाकी तब्बल पंधरा फूट घासत गेली. या दरम्यान दुचाकीवर असलेला संजोग सावंत हा लगत असलेल्या हायवेच्या संरक्षक कठड्याला आदळून काहीसा रस्त्यावर देखील आदळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. तात्काळ उपचारासाठी संजोग ला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याधी अर्ध्या रस्त्यातच रात्री ११:३० वा. च्या सुमारास संजोग ची प्राणज्योत मालावली.

याप्रकरणी संजोग यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महेश गंगाराम चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद सुपल करत आहेत.

संजोग सावंत यांच्या पाश्चात आई, बहीण, भाऊ अस परिवार आहे. संजोग च्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा