श्री स्वामी समर्थ यांची पालखी व पादुकांचे दोडामार्ग शहरात २४ जानेवारीला होणार आगमन
दोडामार्ग
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ यांची पालखी व पादुकांचे दोडामार्ग शहरात शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आगमन होणार आहे.
या पालखी व पादुका दर्शन सोहळा निमित्त श्री स्वामी समर्थ पालखीची मिरवणूक राष्ट्रोळी मंदिर सावंतवाडा ते पिंपळेश्वर हॉल बाजारपेठ पर्यंत येईल, भक्तांनी पालखी खांद्यावर घेताना कृपया अनवाणी असावे, पालखी खालून फक्त लहान मुलांनी अनवाणी जावे. मोठ्यांनी जावू नये., पालखीजवळ अगरबत्ती आणू नये, सायंकाळी ०७.३० च्या आरतीनंतर कृपया आरती ओवाळू नये, सातेरी भुमिका दिंडीपथक खैटवाडा, कासारपाल यांचा दिंडी कार्यक्रम होणार आहे. तर रात्रौ ९ वा श्री साई समर्थ सोंगी (ट्रिकसीनयुक्त) भजन कोल्हापुर यांचे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, बाळुमामा, साईबाबा, देवीचा गोंधळ इतर देवता संताचे दर्शन (जिवंत देखावे) दाखवणारे लोकप्रिय कार्यक्रम दाखविण्यात येणार आहेत. तसेच शनिवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ०५.३० वाजता सामुहीक अभिषेक व शेजाआरती होणार आहे. सर्व कार्यक्रम श्री पिंपळेश्वर हॉल बाजारपेठ दोडामार्ग येथे होतील. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून देवदर्शन, तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग तालुका श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांनी केले आहे.