कळसुलकर हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जंयती व बालिका दिन साजरा…
सावंतवाडी
येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत भुरे, आलेखा नाईक, यशस्वी कासार, कॉलेज प्रमुख प्रा. उत्तम पाटील, प्रसाद कोलगांवकर आदी उपस्थित होते. दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अनुष्का मातोंडकर हिने बालिका दिनाची माहिती सांगितली. तसेच प्रसाद कोलगांवकर यांनी “मुलगी शिकली प्रगती झाली” मंत्र प्रमाणे स्त्रीभ्रूण हत्या ‘ स्त्री – पुरुष जननदर प्रमाण याची तफावत तसेच सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षका, समाजसुधारक, कवयित्री याबद्दल माहिती दिली.