सावंतवाडी एस. टी. आगारात इंधन बचत कार्यक्रम
राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगारात इंधन बचत कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भोसले अभियांत्रिकी महाविद्यालयचे यांत्रिक शाखेचे प्रोफेसर मिलिंद देसाई उपस्थित होते.
यावेळी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे,स्थानक प्रमुख विशाल शेवाळे,वरिष्ठ लिपिक रामचंद्र वाडकर उपस्थीत होते.16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत इंधनबचत मोहीम चालु राहणार आहे.
मिलिंद देसाई म्हणाले,समुद्रात अनेक जहाज फिरत असतात. त्यावर काम करणारा प्रत्येक कर्मचारी तेवढ्याच जबाबदारीने काम करतो.जहाजावर काम करणारा आचारी आपले काम करुन गप्प बसून रहात नाही तर तोही अन्य कामात सहभाग घेतो त्यामूळे समुद्रात चाललेलं जहाज बुडण्याचा धोका कमी असतो.महामंडळ हे पण एक जहाज आहे तुम्हीही जहाजावरिल आचार्यासारखे वागा तरच हे महामंडळ फायद्यात यायला वेळ लागणार नाही.
कोरोना काळात सर्वाना फटका बसला एसटी महामंडळाचे यात खुप नुकसान झाले आहे.तेव्हा सर्वानी निदान स्वतःपासून सुरुवात केली तरी त्यात महामंडळाची नुकसानी थोडीफार भरून येईल. असेही देसाई म्हणाले.
यावेळी चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्थीत होते.