You are currently viewing हे नववर्षा

हे नववर्षा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हे नववर्षा*

 

जुने होऊनी सरते साल मावळले,

सुख दु:खाचे क्षण संगे घेऊन गेले,

आज नव्याने ऊगवले,

घेऊनी नव्या जल्लोषाचे पेले.

क्षितिजावर ऊगवली ,

आज नवीन शुक्राची चांदणी,

दिसते लोभस मोहक देखणी,

ऊधळत चांदणे नव्या आशेचे अंगणी,

नुतन वर्षा हंसत खेळत ये,

आनंदाची गाणी गातच ये,

जुन्या कातर क्षणांना नाहीसे करत ये,

नवा जल्लोष घेऊन ये.

आनंदी आम्ही करतो तुझे स्वागत,

नको भेदाभेद नको रक्तपात,

बंधूभावाचे हळवे बांधुन कंकण,

हे नववर्षा!आतुर तुझ्या स्वागतात.

 

अनुराधा जोशी

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा