You are currently viewing ।। श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना ।।

।। श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्री स्वामी समर्थ कृपेने नव्या लेखन उपक्रमास आरंभ-

************

*।। श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना ।।*

काव्यपुष्प – ३ रे

___________________________

हात जोडोनिया मागणे मागतो । सर्वांचे कल्याण इच्छितो ।

काव्य चरित्र लिहितो । द्यावी प्रेरणा स्वामी समर्था ।।१।।

 

मज गुरुतत्वाचे भारी आकर्षण । मनात गुरूंचे जवळपण।

जाणवे मज ही खुण । सदोदित समर्था ।। २ । ।

 

श्री सद्गुरू प्रेरणा देती । संकेत ही देती । स्फूर्ती देती श्री गुरू । मज लेखन करण्यास ।।३। ।

 

शरण समर्था जाऊ ” काव्य लिहिले । तव चरणी अर्पियले ।अपार समाधान लाभले । मनास माझ्या ।। ४ ।।

 

सद्गुरुंची कृपा मजवरी । स्फूर्ती येई अंतरी । ही ओढ वाढे वरचेवरी । अशा लेखन उपक्रमांची ।।५ ।।

 

अक्कलकोटी दर्शन झाले । मन समाधान पावले । लेखन संकल्प दृढ झाले । समर्थ आशिर्वादाने ।।६ ।।

 

डॉ.यशवंत पाटील सर । स्वामी भक्त नाशिककर ।

शंकरसुत नाव” लेखनावर। स्नेही माझे समर्थ कृपेने ।।७।।

 

गणेश दिवाणजी अक्कलकोटीचे सेवेकरी । भेट-संवाद यांची वरचेवरी। केली यांनी सूचना खरी । स्वामी बखर वाचण्याची ।।८।।

 

श्री दत्त जयंती- २०२४ डिसेंम्बर । स्वामीं ठेविती कृपा-कर । माझ्या मस्तकावर । आरंभ काव्य-वंदना लेखनास ।। ९।।

 

दर गुरुवारी नवी रचना । करीन अर्पण स्वामी चरणा ।

पूर्ण होवो संकल्पना । समर्था, ईच्छा मनाची ।।१०।।

*********

करी क्रमशः हे लेखन कवी- अरुणदास

___________________________

कवी- अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा