You are currently viewing कायी माटी…

कायी माटी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कायी माटी….*

 

काई माटीले इचारा मनोभावे करा सेवा

खेत वावरम्हा देखा कशी निर्मय ती हवा

वारा झुयझुय वाहे कसं मनं भरी जास

बांधबांधवर कसा देखा जीव जडे खास..

 

तिना उपकार देखा फिटनार ना कधीना

असं अमाप हो देनं तिनं नेहमीनं से ना

देस कणग्या भरीन एका दानाना हजार

पाखरे भी खातसं हो खाई खाई त्या बेजार…

 

वावरनी हवा मा हो नही येतसं आजार

बांधवर बठी खावो वल्लं तिखं नि भाकर

कांदा उपाडी लयो नि बुक्की मारी फोडो त्याले

भलती मजा येस बरं बांधवर ती खावाले..

 

बेसन भाकर नि कांदा जोड कैरीनं लोनचं

पंचपक्वान्न फिकं हो त्याना न्यारा महिमाचं

झोका निम ले बांधो नि जावो दूर दूर दूर

मया दिससं डोयाम्हा आठवनीसनां पूर …

 

मायमाटी नं ते देनं तठे कुबेर बी फिका

तिले पिकाडा पिकाडा सोडा सयरना हेका

अंगमोडी करो काम घाम पिकाडसं मोती

मनपासून करी ते फायदाम्हा ऱ्हास खेती…

 

चला खेडाकडे जाऊत वावरम्हा बांधा घर

सर्व सोयी तठे करा धरा ट्रॅक्टर नांगर

नही लागावं औसदं भाजी वावरनी खाता

भलती थोर थोर से हो हाई वसुंधरा माता…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा