*सावंतवाडी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती*
सावंतवाडी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात आज संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी महिला विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, महिला तालुकाप्रमुख नम्रता झारापकर,भारती कासार, शब्बीर मणियार, रमेश गावकर, सुनील गावडे, उपतालुकाप्रमुख राजेश शेटकर, गोविंद केरकर, महिला शहरप्रमुख श्रुतिका दळवी, फिलिप्स रॉड्रिक्स यासंह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.