You are currently viewing स्वागत – नववर्षाचे

स्वागत – नववर्षाचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वागत – नववर्षाचे* 

 

आले आले नववर्ष

करूया तयाचे स्वागत सहर्ष ॥

 

रोमारोमात असू द्या रोमहर्ष

विसरा गतदिवसांचे संघर्ष

नका करू पातकाला स्पर्श

 

आले आले नववर्ष

करूया तयाचे स्वागत सहर्ष ॥

 

नव्या वर्षाची नवी दिशा

नवनवीन नवीच आशा

नवी असो प्रेमाची भाषा

नव्या कल्पना

नवी साधना

नवे आराखडे

नव्या योजना

नवे संकल्प

नवे प्रकल्प

नव्या युगाची नवीच रेषा

नव्या नव्याचा नवाच हर्ष

 

आले आले नववर्ष

करूया तयाचे स्वागत सहर्ष ॥

 

नव्या ओळखी

नवीच मैत्री

नवे सोयरे

नवीच छत्री

नवे विचार घ्या मनी

जुन्याला लावा कात्री

जीवन सारे होईल नवे

नवशुभेच्छांची बाळगू खात्री

नववर्षाच्या स्वागताला

असावा परिसस्पर्ष

 

आले आले नववर्ष

करूया तयाचे स्वागत सहर्ष ॥

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा