*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवे वर्ष…..*
आले वर्ष सरले वर्ष
वर्षा मागून सरे वर्ष
सुख दुःखाचे वारे सारे
भेट देतील नवीन वर्षी
जुने गेले सोने होऊन
नव्याचे आवतन देऊन
नवी पालवी ही कोवळी
समृद्धीची ही सावली
सरत्या वर्षाचा निरोप
पहा वळूनी मागे आता
नको जखमा नको चुका
मार्ग पुढे दिसे समृद्धीचा
चला पाहूया स्वप्ने सुंदर
आरोग्य जपुया निरंतर
अलवार झुळूक नववर्षाची
एक होऊनी पांघरू सुखाची
………………………………….
©पल्लवी उमेश