चिखली( दि.१ जाने.) मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दिनांक २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये पुणे येथे साजरा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साहित्यिक / कवी म्हणून निमंत्रित झालेले प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके डॉ. निवृत्ती जाधव, शाहीर कवी मनोहर पवार, पत्रकार विठ्ठल परिहार, डॉ. मंजू राजे जाधव, संजय हिवाळे, बबन आराख या साहित्यिकांना फुले फेस्टिवल साठी आयोजक श्री विजय वडवेवार हे अथक परिश्रम घेत असून एस. एम. जोशी सांस्कृतिक हॉल मध्ये पत्रकार भवन शेजारी नवी पेठ पुणे येथे भव्य दिव्य काव्य जागर महोत्सवाचे आयोजन केले असून जागतिक किर्तीचा आणि सगळ्यात मोठा काव्य महोत्सव असून यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, केरळ, कर्नाटक, बेळगांव, आदी ठिकाणाहून कवी उपस्थित होत असून भारता बाहेरील कवी सुद्धा हजेरी लावणार आहेत. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्यात त्यामध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील कवींना निवड पत्राव्दारेआमंत्रित केले आहे.
सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथून राजमाता जिजामाता यांचे दर्शन पूजन करून साहित्यिक पुण्यनगरी पुणे मुलींची पहिली शाळा पुणे येथे सावित्रीबाई फुले यांना काव्य रूपाने अभिवादन करणार आहेत. या पूर्वीही मी भिडेवाडा बोलतो या काव्य जागर व्हिडीओ अभियानात त्यांनी भाग घेतला आहे . दिनांक २ ते ५ जानेवारी पर्यंत संपन्न होणार्या फुले फेस्टिवल मध्ये सहभाग घेऊन भिडेवाडा, सावित्री मायी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले वर कविता सादर करणार आहे. सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढून मुलींच्या हाती लेखणी दिली. आज त्यामुळेच राष्ट्रपती, पंतप्रधान, संशोधक म्हणून सावित्रीच्या मुली सर्व ठिकाणी पुढे आहेत.