You are currently viewing नवे साल आले !!

नवे साल आले !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नवे साल आले !!* 

 

जुने साल अस्ताचली गेले

नवे साल उदयाला आले

सूर्यप्रकाशी हे भवताल

नव्या आशेने भरून गेले ||

 

सारी दुःखे दूर होतील

आनंदाला भरते येईल

हातात हात मायेची साथ

घरदार आश्वस्थ होईल ||

 

उमलणाऱ्या कळी प्रमाणे

पुन्हा नव्यानेच फुलायचे

नवीन स्वप्ने साकारताना

हसत हसत जगायचे ||

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

 

*२०२५ वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा !*💐

प्रतिक्रिया व्यक्त करा