*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला कोल्हे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नववर्षांचे स्वागत….*
सरत्या वर्षाला निरोप देता
आठवतात ते सारेच क्षण
नववर्षी पदार्पण करताना
घेऊ नव्या संकल्पांचा प्रण
वाईटास आता सोडून द्यावे
चांगले घेता येईल ते घ्यावे
सत्कार्याची ठेवुनी भावना
जन्माचे या सार्थक करावे
मोळी ही संकटांची बांधुनी
घ्यावी नित्य ध्येयाची भरारी
जीवनात चढउतार येणारच
उस्फूर्त नभी झेप घे करारी
उगवतो नव्या जोमाने रवि
अंतरंगीही स्वप्नांचे कवडसे
आशा नवी नि दिशाही नवी
क्षण सोनेरी स्वर्गाहुनी हवेसे
मतभेदांना विसरून सारेच
दुःख फालतू दळायचे नसते
समभाव आपुलकीने जगून
हृदयी प्रेमांकूर गीत हसते
स्वागत करूया ह्या नववर्षाचे
बीज पेरू आता माणुसकीचे
तिमिरातुनी जाऊया तेजाकडे
कास धरू आता शुभ विचारांचे
………..✍
उज्ज्वला कोल्हे
कोपरगाव