You are currently viewing नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”*

 

बोलबोलता गत साल संपले आनंदात

नुतन वर्षाचे स्वागत करु जल्लोषात।।धृ।।

 

जन्म-मृत्यू अटळ रथचक्र राहे चालत

काळ पुढे जाई कुणासाठी न थांबत

सूर्यास्तानंतर सूर्योदय होणार निश्चित।।1।।

 

कुणाचे कर्माची सुरवात कुणाचा शेवट

कष्ट करावे रहावे सकारात्मक सतत

काळच ठरवील कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ।।2।।

 

सुख-दुःखाच्या आठवणी उजळाव्यात

दुःख विसरावे आठवावे आनंदाचे क्षण

काय मिळवले हरवले याचा घ्यावा शोध।।3।।

 

स्विकारावे सुविधा नवीन शोध तंत्रज्ञान

जीवन पथावर चालावे नि:शंक जपून

समृद्ध सुखी जीवनाचा लुटावा आनंद ।।4।।

 

मागे वळून पहाता दोष चुका टाळाव्यात

प्रत्येक क्षणाचा करावा सदुपयोग सतत

रात्र सरेल येईल उद्याची शुभ पहाट।।5।।

 

व्यायाम करावा आहार असावा संयमित

सुबत्ता येईल सदा जपावे पर्यावरण

रोजनिशी चे संयोजनाची जपावी रीत।।6।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड.महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा