वैभववाडी
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक कोटीचा निधी देणार आहोत अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडीत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केली. तसेच या कामांचे भुमीपुजन व उद्घाटन खासदार व मीच करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत वैभववाडीत आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी आपल्या भाषणात पक्षप्रवेशाबद्दल पालकमंत्र्यांकडे बक्षीसाची मागणी केली. या मागणीला अनुसरून मंत्री सामंत यांनी विकास निधी बाबत घोषणा केली. तसेच महाराणा कलादालनाला पुढील आठवड्यात भेट देणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिक आमदारांना देखील चिमटा काढला. येथील आमदार दुसऱ्यांदा आमदार झाले मी चौथ्यांदा होऊन दोन टर्म मंत्री देखील आहे अस सांगत टोमणा मारला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणी धमकी देत असेल तर मी पालकमंत्री या नात्याने त्यांना योग्य ते उत्तर देईन.याकरिता प्रशासनाचा कसा उपयोग करून ते मला चांगलेच ठाऊक आहे असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी खा.विनायक राऊत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, संदेश पटेल,संजय आंग्रे,तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, रमेश तावडे, बँक संचालक दिगंबर पाटील, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, अशोक रावराणे, स्वप्नील धुरी, बंड्या होळकर, संजय निकम, अतुल सरवटे यासह शिवसैनिक उपस्थित होते.