*काव्य निनाद साहित्य मंच तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*गत आठवणी*
अचानक सुटलेले
आठवणींचे गाठोडे,
कसे कुणा सांगावे,
मन बावरते वेडे।
आयुष्यभराची साथ,
अचानक सुटलेली,
आठवते क्षणोक्षण,
प्रीत ती बहरलेली
आठवती मजला, हो
अनमोल शब्द त्यांचे,
पीळ पडतो हृदयी,
तरीही विसरायचे।
आठवण लाखमोल,
मनी उरी जपलेली
आसवे डोळ्यातली
श्वासातही गुंतलेली
नको आता आठवण
वर्तमान हा जगणे,
सुख गहाण ठेवून,
दुःख जपुनी हसणे।
प्रतिभा पिटके
अमरावती