सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत विनय सावंत प्रथम
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग पीपसाईट या प्रकारामध्ये विनय शिवराम सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवला विनय सावंत हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पडवे गावचा रहिवासी आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल कसाल हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून येथे कौतुक होत आहे.