नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई
तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू
वेंगुर्ला
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) गोवा बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली . राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची गोवा बनावट दारू जप्त (Fake Alcohol seized) केली आहे. या कारवाई एकूण 1668 गोवा बनावटीचा मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातून लक्झरी बस मधून गोवा बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती.नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची गोवा बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. त एकूण 9 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ही बस बांदा चेकपोस्ट. इन्सुलि आर. टी. ओ. फोंडा चेकपोस्ट. कोल्हापूर. कराड. सातारा. कात्रज एवढे चेकपोस्ट पास करून पुण्यापर्यंत आलीच कशी. का बांदा चेक पोस्ट व इन्सुलि आर टी ओ फक्त काय एन्ट्री घेण्यासाठी ठेवले आहेत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी प्रवासी बस मधून अमली पदार्थांची वाहतूक होते असा वेळोवेळी आवाज उठवला पण 200 एन्ट्री पुढे यांच्या आवाज कमी पडला या पुढे लगेच वाहतूक करणाऱ्या बसेस वर कार्यवाही न केल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला.
कुठल्याही चेक पोस्ट ला बस मधून काय येते हे कधीच का चेक केले जात नाही हा प्रश्न मात्र सर्वाना पडला आहे.