दोडामार्ग :
झोळंबे येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव उद्या ३१ डिसेंबर रोजी होत आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता कुळ घराकडून सवाद्य देवतांचे आगमन मंदिरात होणार आहे. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविणे त्यानंतर ओटी भरणे रात्री १२ वाजता सहवाद्य पालखी सोहळा, १ वाजता पाहुणीचा कार्यक्रम व रात्री २ वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड वेंगुर्ला यांचे पौराणिक दशावतारी नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उप समिती झोळंबे व ग्रामस्थांनी केले आहे.