गौतम भोगटे यांचे सीए परीक्षेत यश
मालवण
मालवण तालुक्यातील कट्टा येथील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे बॅ. नाथ पै सेवांगण मालवण विश्वस्त दीपक भोगटे व प्रियांका भोगटे यांचा सुपुत्र गौतम भोगटे याने चाटर्ड अकाऊंटंट ( सीए ) परीक्षेत यश मिळवले. गौतमचे प्रा शिक्षण कट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व १० वी पर्यंतचे शिक्षण वराडकर हायस्कूल कट्टा येथे मराठी माध्यमात झाले. ७ वी स्कॉलरशीप व आठवी एनएमएमएस परीक्षेत तो मेरीटला आला होता. एसएस सी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवले होते. तर १२ वीत ८४ टक्के गुण होते. त्याचे कॉमर्स ग्रेज्युएशन वर्तक कॉलेज वसई येथे झाले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.