*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
नव रंगाने, नव तेजाने
हरित पर्णांच्या गुच्छामधुनि,
विविध रंगी फुले उमलती
नव रंगाने, नव तेजाने सर्वां ती
आपलेसे करुनि भुलविती.
प्रसन्नतेच्या नवोर्मि नित लेऊनि
सुगंधा च्या कुपी उलगडती
रक्त,श्वेत,पीत,गर्दगुलाबी,नील,
जांभळ्या छटांमध्ये फुलुन येती.
रंगीत फुलपाखरे हर्षित होऊनि
फुलाफुलांवर स्वैर बागडती,
लुसलुशीत हिरवळीस बिलगुनि
खुणावती दवबिंदूचे मोती.
न मागता दिधले नेत्रसुखावुनि
सुख मिळे इतुके मम हृदयाती
निसर्गाचे सौंदर्याविष्कार पाहुनि
आनंदाचे क्षण ओसंडून वाहती.
स्वेच्छेने तू दिधले ते मनी जपुनि
काय मागू आता देवा तुजप्रती,
हेच हवे शाश्वत मजआशीर्वचनी
आजन्मकृतज्ञतावसेममहृदयाती
💐🌷🪴🌳🌻🌹🌷🌼🌸🌺🪷🪻☘️🌿🌴🎄🌱
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर