*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फुलांच्या गावी*
लाल गुलाब डोलतो
कमानीवरती छान
पिवळा, केशरी, पांढरा
रंग विसरतो भान
सकाळी उमलतो
केशरी गुलाब
रंग त्याचा लाजबाब
पाहून घ्या रुबाब
रातराणी पहाटेला
पानोपानी फुलली
सुगंधाचा सडा
वेल खाली झुलली
सुगंधी चाफा बघतो
रातराणीच्या छटा
मोहीत होऊन जातो
शोधत सुगंधी वाटा
कमानीवरती जाई जुई
छान छान फुलल्या
किलबिल पाखरांची
रानंवेली सजल्या
हास हास हसते
सदाफुली डोकावते
डोंगराच्या कपारीत
हळुच मान मुरकते
वाटतं एकदा जावे
फुलांच्या गावाला
घ्यावे त्यांचे रंग,गंध
विसरुन जावं स्वतःला
*शीला पाटील नाशिक*