*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. शैलजा करोडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अलविदा मित्रा*
( सरत्या वर्षाला निरोप )
———————
मित्रा तुला अलविदा म्हणतांना
खूप गहिवरून आलंय रे
तू नव्याने आलास तेव्हा
तुझं जंगी स्वागत झालं
एक आनंदतरंग घेऊन आलास
तू माझ्या जीवनात
माझ्या सुखदुःखाच्या क्षणांशी
एकरूप झालास
संकटसमयी माझं बळ शक्ती ठरलास
माझ्या आनंदात दिलखुलासपणे
सहभागी झालास
तुझ्या कुशीत मी कधी अश्रूंनाही
वाट मोकळी करून दिली
तू आंजारलं गोंजारलंस
प्रेमानं सांत्वन केलंस
आणि आता क्षण येऊन ठेपलाय
तुला निरोप देण्याचा
तुझ्याशी खूप बोलायचयं
काही सांगायचयं
पण तू तर निघालास
काय म्हणालास मित्रा
काळ कोणासाठी थांबलाय
बरोबर आहे मित्रा तुझं
माझीचं सगळी गात्रं थकलीत
मीच नाही धावू शकले तुझ्या वेगाने
तू निघालास मित्रा
पुन्हा कधीही परत न येण्यासाठी
पण तुझ्या आठवणी मी
जपून ठेवल्यात ह्रदयकुपीत
अलविदा मित्रा
अलविदा अलविदा अलविदा
———————————————
डाॅ. शैलजा करोडे©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391