*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संकल्प*
नववर्षापुर्वी मनोमनी
जन करीती नवे संकल्प
आजवरी ना पुर्ण जाहले
हाती घेतलेत जे प्रकल्प
छोटे छोटे संकल्प करूया
ऐसे स्वतःसाठी जगण्याचे
छंदामध्ये रममाण होता
क्षण लुटावे ते आनंदाचे
नको उलटा अर्थ काढावा
मनावरी आघात होणारा
संकल्प सकारात्मकतेचा
आत्मविश्वास वाढविणारा
झटकुनी टाकूया आळस
ऐसा हवा मनाचा निर्धार
योजनापुर्वक संकल्प ते
प्रत्यक्षात होतील साकार
धाव धाव धावतो आपण
जगासवे स्पर्धा करावया
गमावून बसतो सर्वस्व
जेव्हा साथीला नसते काया
चंद्रशेखर द. धर्माधिकारी
वारजे,पुणे. जिल्हा पुणे©️