You are currently viewing ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त साईपादुका पूजन सोहळा संपन्न

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त साईपादुका पूजन सोहळा संपन्न

पुणे:

२८ डिसेंबर २०२४ रोजी धायरी पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी वि.ग.सातपुते. (विगसा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेहमीच्या प्रथेनुसार साईबाबा पादुका पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) या संस्थेतर्फे बेंगलोर येथील ज्येष्ठ साहित्यिक, समर्थभक्त डॉ. राजेंद्र पडतुरे बेंगलोर यांचा त्यांनी लिहिलेल्या *मनाचे श्लोक* या साहित्यकृतीचा *जर्मनभाषेत* या अनुवाद केला असल्यामुळे महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे *मानाची पुणेरी पगडी, मानपत्र, समर्थ रामदास स्वामींचे तैलचित्र, शाल, हार, श्रीफळ देवून ज्येष्ठ साहित्यीक डॉ. न. म. जोशी, प्राचार्य डॉ. सू. द. वैद्य, मा. काकासाहेब चव्हाण, मा. आमदार भीमराव तापकीर, मा.विकासनाना दांगट पाटील मा. बाळासाहेब नवले, ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते, भावकवी वि.ग.सातपुते, डॉ. महेंद्र ठाकुरदास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे मान्यवर कवी/ कवयित्री काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध भागातील कविवर सहभागी झाले होते त्यात जया जोशी (बेळगाव), डॉ. लक्ष्मण शिवणेकर (मुंबई), अरुण देशपांडे, व्यंकटेश कुलकर्णी (हैद्राबाद) प्रतिभा पवार, मिनाक्षीताई नवले, ज्योतिताई सरदेसाई, मिनाताई सातपुते, शुभदा उदगावकर, शुभदा जोशी, जयंत देशपांडे, दिपाराणी गोसावी, किरण जोशी, भाग्यश्री दायमा, रामचंद्र किल्लेदार (ग्वाल्हेर) जयश्री श्रोत्रीय, डॉ. दाक्षायणी पंडित, चंचल काळे, राजश्री सोले, जयश्री देशकुलकर्णी, यशवंत देव, मकरंद घाणेकर, साजन पिलाणे, सुनीता टिल्लू, वंदना घाणेकर, मकरंद घाणेकर, राधिका दाते, संध्याताई गोळे, सौ. नूतन शेटे, मकरंद कुलकर्णी, सुनील खंडेलवाल, विवेक पोटे, अमोल शेळके, सतीश शिंगवेकर, त्र्यंबक बोरीकर, ऋचा कर्वे ही सर्व सारस्वत कवी मंडळी काव्यसंमेलनात सहभागी झाली होती.

राधिका दाते, ऋचा कर्वे, ऍड संध्याताई गोळे, सौ. वंदना घाणेकर, श्री. यशवंत देव, श्री. मकरंद घाणेकर, कौस्तुभ सातपुते या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

*कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रातील ज्येष्ठ, मान्यवर मंडळी उपस्थित होती.*

कार्यक्रमानंतर महाआरती झाली आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा