*सिंधुदुर्ग जिल्हा माजी कबड्डीपटू खेळाडूंचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
*सावंतवाडी*
सिंधुदुर्ग जिल्हा माजी कबड्डीपटू यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन १९८ ते २००० या कालावधीत ज्या कबड्डी खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्यासाठी प्रतिकुल परिस्थितीत भरीव कामगिरी केली त्या सर्व माजी खेळाडूंचा स्नेह मेळावा श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. या वेळी सर्व माजी कबड्डी खेळाडूंचा आदर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे मा. युवराज श्रीमंत लखमराजे सावंत भोसले सावंतवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. मा. श्री. दिपकभाई केसरकर, आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, मा. खेळाडू अध्यक्ष : मा. श्री. रणजीत राणे, निवृत्त जिल्हा अधिकारी, वनविभाग मा. श्री. रुजारिओ पिंटो, मालवण मा. श्री. प्रशांत वारिक, देवगड मा. श्री. जया चुडनाईक, वेंगुर्ला मा. श्री. प्रकाशराव बिद्रे, सावंतवाडी प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्री. अनिल हळदिवे, कणकवली मा. श्री. संजय भोगटे, कुडाळ मा. श्री. सोमनाथ गोंधळी, दोडामार्ग उपस्थित होते.
यावेळी दिवंगत माजी खेळाडूंना श्रध्दांजली वाहण्यात आली. शिक्षक, पंच, मार्गदर्शक यांचा सत्कार व मनोगत, खेळाडूंचे मनोगत व्यक्त केले.
पाहुण्यांचे मार्गदर्शन, अध्यक्षीय मनोगत
भोजन विश्रांती, सावंतवाडी खेळाबाबत मार्गदर्शन
सायंकाळी चहापान सायंकाळी निरोप समारंभ पार पडला.
श्रीयुत दीपकभाई, लखम राजे, रणजीत राणे, वसंत जाधव, सुरेंद्र बांदेकर, जावेद शेख, पराडकर प्रकाश, बिद्रे, शिवप्रसाद बांदेकर जिल्हाभरातील प्लेयर उपस्थित होते.