You are currently viewing आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील – उदय सामंत

आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील – उदय सामंत

वेंगुर्लेत मोफत महाआरोग्य शिबिराचे उदघाटन…

वेंगुर्ले

आरोग्य सुविधा ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही काम करतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे जे स्वप्न होत त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. केसरकर पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आरोग्यासाठी सिंधुदुर्गात खर्च झाला. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केली.
वेंगुर्ले तालुका शिवसेना व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या पुढाकाराने आयोजित मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, माजी जि प अध्यक्ष विकास कुडाळकर, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, रुची राऊत, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सुनील डुबळे, संदेश निकम, बाळा दळवी, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उपजिल्हासंघटक श्वेता हुले, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, हृदयविकार तज्ञ डॉ श्रीकांत माने, हाडांचे तज्ञ डॉ अनिल नाईकवडी, मूत्र व किडणीविकार तज्ञ डॉ राहुल पाटील, डॉ सौरभ गांधी, डॉ वजराठकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, नगरसेविका सुमन निकम, विवेक आरोलकर, मंजुषा आरोलकर यांच्यासाहित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.
या शिबिरात तालुक्यातील सुमारे ४०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ५ स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या टीमने हृदयविकार, हाडाचे विकार, मूत्र व किडनी विकार, कॅन्सर लक्षणे, सर्जरी व गेस्ट्रोएट्रोलॉजी व अन्य तपासणी करण्यात आली. यात अधिक उपचार आवश्यक असल्यास कोल्हापूर येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, डॉक्टर उपलब्धता ही जिल्ह्यातील सर्वात मोठी समस्याच होती. मात्र यावर मुख्यमंत्री यांनी उपाय शोधून काढला व शासकीत वैद्यकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. येत्या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल त्यानंतर डॉक्टर उपलब्धता ही समस्या दूर होईल. हे उत्कृष्ट आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल वेंगुर्ला शिवसेनेचे कौतुक करतो, असे श्री. राऊत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा