मुंबई:
भंडारी मंडळ भांडुप कांजूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन भांडुप येथील बॅरि.नाथ पै विद्यालयात दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विनोद चव्हाण, प्रमुख पाहुणे श्री. पंकज जाधव, महापालिका अधिकारी व पोलीस अधिकारी श्री मदन पाटील साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
भंडारी मंडळ भांडुप कांजुरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पार पडलेल्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष श्री.विनोद चव्हाण, प्रमुख पाहुणे श्री.पंकज जाधव, श्री.मदन पाटील तसेच भंडारी हितवर्धनीचे विश्वस्त श्री. सुधीर नवार या सर्वांनी दिनदर्शीका व भंडारी समाजाबद्दल आपले बहुमूल्य विचार व्यक्त केले. मंडळाचे सचिव श्री.प्रफुल्लकांत वाईरकर यांनी प्रस्तावना व मंडळाची पन्नास वर्षाची यशस्वी वाटचाल यांची माहीती सर्वांना दिली. दिनदर्शिकेबद्दल श्री.संजीव पारकर, श्री.किरण खोत, श्री.रवी चराटकर, श्री.बारस्कर, श्री.एरलकर, ह.भ.प. श्री भाई कोठारकर, विक्रोळीचे श्री.राजू पेडणेकर, सल्लागार श्री.रमेश विलणकर आणि कु. वेदिका चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद चव्हाण यांनी सर्वांना भंडारी समाजाच्या इतिहासबद्दल माहीती दिली व भंडारी समाजाचे अस्तित्व प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी या दिनदर्शिकेची निर्मिती झाली आहे व त्यासाठी आपण सर्वांनी जाहिराती रूपाने शुभेच्छा देऊन समाजाला सर्वाभूमिक केले त्या बद्धल सर्वांना धन्यावाद दिले. मंडळाचे खजिनदार श्री.गुंडु बांदवलकर अणि मयेकर ताई यांनी श्री.सुरेश पेडणेकर अणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.पेडणेकर, राजापूरकर, पेटकर, सौ.तांडेल, चेंदवनकर, चराटकर यांनी विशेष सहभाग नोंदवला.

