You are currently viewing सावंतवाडी रुग्णालयामध्ये झाराप गावकरवाडीतील डेंगूसदृश्य मुलीवर योग्य तो औषधोपचार सुरू 

सावंतवाडी रुग्णालयामध्ये झाराप गावकरवाडीतील डेंगूसदृश्य मुलीवर योग्य तो औषधोपचार सुरू 

सावंतवाडी रुग्णालयामध्ये झाराप गावकरवाडीतील डेंगूसदृश्य मुलीवर योग्य तो औषधोपचार सुरू

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका झाराप गावकरवाडी या गावातील नऊ वर्षाची मुलगी डेंगूसदृश्य तापामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले तीन दिवस उपचार घेत आहे, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे*

*सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका झाराप गावकरवाडी या गावातील नऊ वर्षाची मुलगी डेंगूसदृश्य या आजाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले तीन दिवस उपचार घेत आहे त्याची प्लेटलेट साडेचार लाख वरून 56 हजार पर्यंत झाले आहेत त्याच्यावरती सावंतवाडी रुग्णालयामध्ये योग्य तो औषधोपचार रुग्णालयाकडून केला जात आहे*

*आता त्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे त्याचा ताप आता गेला असून आता प्लेटलेट प्रमाण उद्यापासून वाढणार आहे अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.*

*तीन दिवसानंतर कोणत्या व्यक्तीला ताप आल्यानंतर रक्त तपासणी करणे गरजेचे असते त्यामध्ये सीबीसी एकूण साडेचारला पेक्षा कमी होऊन दीड लाख असल्यास म्हणजेच रक्तातील प्लेटलेट तपासल्यानंतर डेंगू मलेरिया टायफड कावीळ तसेच शेतीच्या सीजनमध्ये लेप्टो असे विविध प्रकारचे तपासणी रुग्णालयात येऊन रक्त चाचणी करावी लागते*

*त्यानंतर वेगवेगळ्या तापावरती वेगवेगळी औषधोपचार असतात हे रुग्णांच्या नातेवाईकांनी समजून घेणे गरजेचे आहे डेंगू हा घराच्या आजूबाजूस घाणीची पाण्याचे डबके साचलेले असतात त्यामुळे डेंगूची पैदास होते आणि रात्रीच्या वेळी डेंगू मच्छर घरात घुसून चावा घेतल्यानंतर हा डेंगूसदृश्य आजार संभवतो*

*त्यामध्ये अशी डबकी असल्यास ती बाजूला करावी व नष्ट करावी त्यामध्ये जळके ऑइल किंवा ब्लिचिंग पावडर नागरिकांनी टाकावी तसेच मलेरिया हा ताप आजूबाजूला झाड झुडपी वाढलेली असतात*

*घराच्या अवतीभवती साफसफाई ठेवल्यास मलेरीचा मच्छर ताप येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच टायफड हा ताप पाणी अशुद्ध असल्यामुळे होतो तसेच तसेच गरम पाणी करून थंड पाणी प्यावे तसेच विहिरीमध्ये दरवर्षी जाडे मीठ एक शेर त्याचप्रमाणे तुरटी अर्धा किलो तसेच व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्यात टाकण्यासाठी औषधे किंवा फ्लोरिंग पावडर मेडिकल दुकानांमध्ये आणून टाकावे*

*जेणेकरून पाणी शुद्ध होऊन आपल्याला टायफड होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच दर दोन ते तीन वर्षांनी आपली विहीर आजूबाजूला असल्यास व आपली नसल्यास वर्गणी काढून उपसून घ्यावी*

*जेणेकरून अशुद्ध पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी अशुद्ध पाणी असल्यास टायफड कावीळ तसेच सतत संडास होणे असे प्रकार अशुद्ध पाणी पिल्यामुळे होतात*

*यामुळे पाणी गरम करून थंड करून पिण्यात यावे अशी काळजी घेतल्यास कोणत्या प्रकारची ताप होण्याची शक्यता नसते त्याचप्रमाणे शेतामध्ये उंदराच्या लघवीपासून मातीत मिक्स लघवी मिक्स झाल्यास पायाच्या बोटामध्ये जखम असलेल्या त्या व्यक्तींना शेतामध्ये काम करत असलेल्या व्यक्तींना लेप्टो सदृश्य असा ताप होतो याची माहिती सर्व नागरिकांना नसते आणि अशी रुग्ण रुग्णालयात दिसतात*

*पण ताप आलेला रुग्ण हा कॉट वरती झोपून उपचार घेत असतो व रुग्णांची नातेवाई क जमिनीवरती खाली चटई वरती झोपत असतात असे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून योग्य तो उपचार व दक्षता घेतल्यास कोणाला रुग्णांना रुग्णालयात यायची पाळी येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष उभा बाजार सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग श्री. राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे*

*आपला विश्वासू*.
*श्री. राजेंद्र प्रभाकर मसुरकर.*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*उभा बाजार सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*मोबा 9422435760*

 

✴️⚛️🛑✴️⚛️🛑✴️⚛️🛑✴️

प्रतिक्रिया व्यक्त करा