You are currently viewing सावंतवाडी येथे सायबर गुन्हा विषयावर जनजागृती अभियान

सावंतवाडी येथे सायबर गुन्हा विषयावर जनजागृती अभियान

‌‌सावंतवाडी येथे सायबर गुन्हा विषयावर जनजागृती अभियान

सावंतवाडी

सायबर गुन्ह्यांमध्ये विविध पातळ्यांवर लोक फसत आहेत तर पेन्शनरना गंडा घातला जात आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात लोक, विद्यार्थी सापडले आहेत त्यामुळे जनतेने जागृतपणे पोलिसांना वेळीच माहिती दिली तर कारवाई जलदगतीने होवू शकते असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. आतापर्यंत यासाठी ३०० कार्यक्रम घेऊन जागृती केली आहे. जनतेने पुढे यायला हवे असे त्यांनी आवाहन केले.

सावंतवाडी मधील रिक्षा चालक व मालक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, जेष्ठ नागरिक, पोलिस पाटील यांना सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. काझी शहाबुद्दिन हॉल येथे सायबर सुरक्षित भारत, नशा मुक्ती त्याचप्रमाणे डायल ११२ जनजागृती अभियान अंतर्गत जनजागृती मोहिमेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या जनजागृती बद्दल माहिती देऊन लोकांनी घटना घडल्यानंतर वेळीच पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा