*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जीवन दर्शन*
पंत पंढरीचे वारकरी
कुळकर्णी पद भूषवती
गोंदवले गावाची महती
रावजी परंपरा सांभाळती
ऐशा घरी जन्मले श्रीमहाराज
मूळ नाव त्यांचे गणपती
भगवंत प्रेम जयाचे अंगी
मिळाली दैवी गुणसंपत्ती
जाई रामनामात रंगून
केले तीर्थाटन,ज्ञान संपादन
लाभले तुकामाईंचे शिष्यत्व
ब्रह्मचैतन्या दिले आलिंगन
केला त्रयोदशाक्षरी मंत्र जप
दीनांची सेवा,नामाचा प्रसार
प्रपंच करत होती विरक्त वृत्ती
प्रसंगी घडविले चमत्कार
महाराजांचे जीवन दर्शन
उत्तम मार्गदर्शक ठरावे
व्हावे रामनामात तल्लीन
उर्वरित आयुष्यात अनुभवावे
||श्रीराम जय राम जय जय राम ||
विजयाकेळकर______
नागपूर