*कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी केले कौतुक*
कसाल ( ता.कुडाळ) येथील प्रसिद्ध उदयोजक संतोष कदम यांची सुकन्या तन्वी कदम हिने *चार्टर्ड अकांऊटंट* CA या परीक्षेत सुयश मिळविले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी तिचे अभिनंदन केले.
पहिल्या प्रयत्नात चांगले गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली. कु. तन्वी कदम हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी तन्वी हिचे कौतुक केले. तसेच तिचे आई वडिल श्री संतोष कदम आणि सौ. डॉ. श्रेया कदम यांचेही अभिनंदन केले.