कोलझर येथील श्री माऊली देवीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव…
दोडामार्ग
कोलझर येथील श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची पुजा अर्चना व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे हे कार्यक्रम होतील. बारा वाजता पालखी सोहळा होईल. त्यानंतर आजगावकर दशावतार यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येत आहे.