You are currently viewing राणे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान – जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी तथा ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज विजयसिंह काळे

राणे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान – जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी तथा ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज विजयसिंह काळे

*राणे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान – जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी तथा ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज विजयसिंह काळे*

*तालुका वैभववाडी येथील शिराळे बीएसएनएल टॉवरच्या कामाला सुरुवात*

*ग्रामपंचायत सडूरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांची ग्रामपंचायत निवडणूकीत देलेल्या वचनाची पूर्तता*

*वैभववाडी-*

ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवलराज काळे यांनी शिराळे ग्रामस्थांना नेटवर्क ची अडचण दूर करण्याबाबतचे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदर नारायण राणे साहेब व मंत्री नितेश राणे त्यांच्या माध्यमातून बीएसएनएल टॉवर मंजूर करून घेतला. सदर कामाचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन टॉवरच्या केबल चे काम पूर्ण झाले होते. परंतु काही टेक्निकली व नैसर्गिक अडचणींमुळे मुख्य टॉवरचे काम सुरू होण्यास विलंब झाला होता. याबाबत गेले काही महिने ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क करा पाठपुरावा केला. या पाठपुरावाला गावातील जनतेचे उत्तम सहकार्य मिळाले व आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत देव गांगो देव रवळनाथ देवी पावणाई यांस श्रीफळ वाहून प्रत्यक्ष टॉवर उभारणीला सुरुवात करण्यात आले. यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी सन्माननीय राणे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले जनतेच्या सहकार्यातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले पुढील काम यशस्वीरित्या सर्वांनी लक्ष देऊन पूर्ण करून घेऊ,गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करूया असे प्रतिपादन श्री काळे यांनी केले. यावेळी सन्माननीय नारायण राणे साहेब नितेश राणे साहेब यांचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काळे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा सडुरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य ,माजी उपसरपंच सखाराम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कोंडू शेळके, गंगुबाई शेळके,शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, शिराळे भाजपा भटके विमुक्त आघाडी बूथ अध्यक्ष विठ्ठल उर्फ बाळा शेळके, रामचंद्र बोडेकर, अंबाजी बोडेकर, गंगाराम बोडेकर, घाटू कोकरे, संजय कोकरे, अंबाजी बोडेकर, रामचंद्र शिंदे, नंदा बोडेकर, रुक्मिणी शेळके, महेंद्र शेळके जेसीबी मालक भिकाजी व इतर वैभववाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा