You are currently viewing किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी कामास सुरवात

किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी कामास सुरवात

किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी कामास सुरवात

कामाच्या फाउंडेशनची खोदाई सुरु

मालवण

मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाउंडेशनची खोदाई सुरु करण्यात आली आहे.

राज्य सरकारने याठिकाणी ६० फुट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे.

राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदाची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मीमी जाडीचा पुतळा तयार होत आहे.

डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फुट इतकी असणार आहे. तर पुतळा ज्यावर उभा असेल तो ३ मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर १० वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे.

आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल. नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी-मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा