पुणे :
उत्तराखंड येथे 38 व्या नॅशनल गेमचे आयोजन 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचा जलतरण, वॉटरपोलो, डायविंग संघ निवड 4 व 5 जानेवारी रोजी बालेवाडी पुणे येथे होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना सचिव तथा स्विमिंग फेडरेशन इंडिया निमंत्रक राजेंद्र पालकर यांनी दिली आहे. जे स्पर्धक या निवड चाचणीत सहभागी होणार आहेत त्यांनी 2 जानेवारी पर्यत आपली नाव नोंदणी राजेंद्र पालकर मोबा 9322862062 यांच्याकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.