*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
___________________________
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचारितावली काव्यपुष्प-११० वे
___________________________
श्री सद्गुरू कृपेने । श्री कुलदेवता आशीर्वादाने । सर्वांच्या
सदिच्छेने । श्रीमहाराज काव्यचरितावली “हे लेखन जाहले ।।१ ।।
श्री महाराजांची कृपा झाली । त्यांनीच प्रेरणा दिली । अन हाती लेखणी दिली । काव्यचरितावली लेखनासाठी ।।२।।
गुरुवार- १७ नोव्हेंबर -२०२२ साली । काव्यचरितावली लेखना सुरुवात झाली । पहिली रचना लिहिली । याच सुदिनी ।। ३ ।।
या दोन वर्षांच्या काळात । होतो जणू मी सहवासात ।
आणि कृपाछत्रात । श्री महाराजांच्या ।।४ ।।
एके दिनी गोंदवल्यास जाऊनी । लिहिलेल्या काही कविता
ठेविल्या समाधी-चरणी । अन केली त्यांना विनवणी । द्यावा आशीर्वाद लेखनाला ।। ५ । ।
श्री महाराज भक्तवत्सल खरोखरी । अनुभूती मज आली
हीच नित्य खरी । चाले लेखणी झरझरी । काव्यचरितावली लिहितांना ।। ६ ।।
मनी चिंतन रामनाम । घ्या सदा हे नाम । आवडेल मनास हे काम । सांगणे श्री महाराजांचे ।। ७ ।।
संकल्प केला माझ्या मना । लिहीन एकशे अकरा(१११) रचना । करी नित्य प्रार्थना । श्री महाराज चरणी ।।८ ।।
ही एकशे दहावी रचना । मनात आनंद भावना । श्री महाराजांना आली करूणा । मज पामराची ।। ९ ।।
भक्तजन हो. रचना १११ वी झाली लिहूनी । करीन अर्पण
श्री चरणी । बुधवारी- मार्गशीर्ष कृष्ण दशमी- शके-१९४६ पुण्यतिथी दिनी । इंग्रजी तारीख २५ डिसेंम्बर- २०२४,
आहे हो या दिनी ।। १० ।।
___________________________
कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.
9850177342
___________________________