पुणे:
बेंगलोर येथील प्रा.डॉ. राजेंद्र पडतुरे यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या *मनाचे श्लोक* या रचनांचा *जर्मन भाषेत अनुवाद केला आहे. त्यांच्या या महान साहित्य संपदेबद्दल त्यांना “महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे( महाराष्ट्र )”* या ख्यातनाम साहित्यिक संस्थे तर्फे पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, व समर्थ रामदास स्वामींचे तैलचित्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदरचा गौरव सोहळा पुणे येथे २८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे, अशी माहिती महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक अध्यक्ष माधव उर्फ वि. ग. सातपुते(आप्पा) यांनी दिली आहे. महाकवी कालिदास प्रतिष्ठान तर्फे नेहमीच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान केला जातो, तसेच साहित्य क्षेत्राच्या उन्नतीसाठी सत्कार सोहळे, स्नेहसंमेलन आदी भरीव असे कार्य सुरू असते.