You are currently viewing कविता जन्माला यावी लागते – वि.ग.सातपुते

कविता जन्माला यावी लागते – वि.ग.सातपुते

पुणे : 

कविता करता येत नाही. ती जन्माला यावी लागते. माणसाचे जीवन हे माणसांच्या सहवासातून वाढते. सहवासातून संस्कार घडतात. संस्कारातून कृतज्ञता आपल्यासमोर येते आणि जीवन आपले कृतार्थ होते. त्याचप्रमाणे शब्द हे ईश्वराचे दान आहे. मात्या पित्याला मूल असते तसेच कविताही कवींचे अपत्य असते. ते शब्द ओळी अंतरा मिळून कविता तयार होते. त्यामुळे कवितेवरही तेवढेच प्रेम असते. कवितेवर चांगले संस्कार केल्यास ती सुंदर कविता ओठावर येते. असे विचार सातपुते आप्पा यांनी व्यक्त केले.

साहित्य सम्राट पुणे आणि माणुसकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने १९६ वे कवी संमेलन धायरी पुणे येथील मनोहर हॉलमध्ये संपन्न झाले.

यावेळी मंचावर माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक वि.ग.सातपुते, कवी संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत भालेराव आणि साहित्य सम्राट संस्थेचे अध्यक्ष विनोदजी अष्टुळ मान्यवर उपस्थित होते.

साहित्यिकांनी माणुसकीची चावी ओळखून साहित्य लिहिले पाहिजे आणि ते साहित्य सम्राटासारखे रुबाबदार झाले पाहिजे. असे मत अष्टुळ यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केले. यावेळी हिंदी मराठी कवी कवयित्रींचे कवीसंमेलन संपन्न झाले. यामध्ये रसिका भवाळकर, रेखा साळुंखे, लता कुलकर्णी, रागिनी जोशी, नलिनी पवार, अलका पाटील, अनघा असलेकर, श्रद्धा असलेकर, छाया भगत, अनिता रानडे, सतीश शिंगवेकर, जितेंद्र सोनवणे, अविनाश असलेकर, महिंद्रा माणिक, हृदयी प्रकाश वैद्य, शाहीर शिवाजी थिटे, राहुल भोसले, प्रा. रेखा फाले, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामगडे, प्रा. आनंद महाजन आणि प्रार्थना सदावर्ते इ. कवी कवयित्रींनी काव्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार डॉ.राजेंद्र भोळे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा