कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वार्षिक अधिवेशन माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय यांच्या सहकार्याने येत्या रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव वाचनालय येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन उडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, प्रमुख पाहुणे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, सरपंच मनिषा भोसले, पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सगुण धुरी आधी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८:३० वाजता प्रतिनिधी नोंदणी परिचय, अल्पोहार, सकाळी ९:३० वाजता ग्रंथदिंडी, सकाळी १०:३० वाजता अधिवेशन उद्घाटन सोहळा, दुपारी १:३० वाजता भोजन, दुसऱ्या सत्रात दुपारी २:३० वाजता खुले अधिवेशन आणि सायंकाळी पाच वाजता समारोप असा कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव राजन पांचाळ व माणगाव वाचनालय अध्यक्ष सौ स्नेहा फणसळकर यांनी केले आहे.