_*भोसले फार्मसी कॉलेजचे आविष्कार संशोधन परिषदेमध्ये यश…..*_
_*मिहिका चव्हाणच्या प्रकल्पाला अंतिम फेरीत स्थान…..*_
सावंतवाडी
_यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी.फार्म व एम.फार्मच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार संशोधन परिषद २०२४’ मध्ये सहभागी होत सुयश प्राप्त केले. ही परिषद जोगेश्वरी येथील एच.के.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कॉलेजच्या एकूण ८४ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होत १७ प्रकारचे संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये विविध प्रकारची क्रीम्स व जेल बनवणे, जड धातूंचा शोध घेणे इ.विषयांचा समावेश होता._
_यापैकी अंतिम वर्ष बी.फार्मसीच्या वर्गात शिकणाऱ्या मिहिका चव्हाण हिच्या संशोधन प्रकल्पाने अंतिम फेरीत स्थान मिळवले. हॅलिटोसिस म्हणजेच दुर्गंधीयुक्त उच्छवास नियंत्रित करण्यासाठी औषधी वनस्पतीयुक्त गोळ्यांचा विकास हा तिच्या संशोधन प्रकल्पाचा विषय होता. यासाठी तिला प्रतीक फगारे, विरेश साळकर, महेश बडे व तुषार सोनार या विद्यार्थ्यांची मदत झाली. तसेच प्रा.स्नेहा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परिषदेसाठी समन्वयक म्हणून डॉ.गौरव नाईक व सिद्धी वेर्णेकर यांनी जबाबदारी सांभाळली._