You are currently viewing २४ डिसेंबर रोजी कणकवलीत येथे ‘नृत्यापर्ण गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन

२४ डिसेंबर रोजी कणकवलीत येथे ‘नृत्यापर्ण गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली :

कणकवलीत येथे जिल्ह्यात प्रथमच गीत रामायण कार्यक्रम सादर होत आहे. बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्सव “पदन्यास २०२४” या कार्यक्रमानिमित्त गीत रामायण हे नृत्य नाट्य मोफत पाहायला मिळणार आहे. ज्याचे सादरीकरण सुप्रसिद्ध नृत्यांगण आणि नृत्यदर्शिका दिपाली विचारे (ऋतुजा नृत्यालय पालघर) आणि त्यांचा ग्रुप सादर करणार आहेत.

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येत्या २४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पदन्यास २०२४ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पदन्यास हा विद्यार्थ्यांच्या पावलांनी साकारलेल्या नृत्याचा प्रवास आहे याच विद्यार्थ्यांनी पारंपारिक भारतीय नृत्यशैली सह समकालीन नृत्यशैलीच्या माध्यमातून आपल्या कला कौशल्याचे साजरीकरण करणार आहेत. ताल, लय, मुद्रा आणि हावभाव यांचा अनोखा संगम या नृत्यांमध्ये दिसून येईल.

“गीत रामायण” या कार्यक्रमानिमित्त रामायणातील महत्त्वाचे प्रसंग नृत्यद्वारे सादर करण्यात येणार असून रामजन्म, सीतेचे स्वयंवर, वनवास, रावण वध आणि रामराज्याभिषेक या प्रसंगावर आधारित नृत्य, संगीत आणि अभिनयाचा अप्रतिम मिलाफ पाहायला मिळणार आहे.

अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था आणि बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सर्व पालक, नागरिक आणि हितचिंतकांना या भव्य सांस्कृतिक सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा