*मासेमारांसाठी ट्रान्सपॉन्डर (Transponder) उपकरणाचा जनजागृतिपर कार्यक्रम संपन्न*
रिलायन्स फाउंडेशन प्रस्तुत, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रान्सपॉन्डर (Transponder) उपकरणाची जनजागृति कार्यक्रम गुहागर तालुक्यातील पडवे गावात आयोजित करण्यात आला . मासेमारी करणारे मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या सुरक्षिततेसाठी मासेमारांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसाविण्यास मस्त्यव्यवसाय विभाग, रत्नागिरी यांनी सुरवात केलेली आहे.
यावेळी श्री. स्व. बा. चव्हाण परवाना अधिकारी, गुहागर यांनी मासेमारांना ट्रान्सपॉन्डर उपकारांची इत्यंभूत माहिती मासेमारांना दिली व आपत्कालीन परिस्थितीत जसे कि, आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास, नौका समुद्रात बुडत असल्यास नौकांवर खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश कसा पाठवता जातो व त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो. व त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपव्दारे नियंत्रण कक्षाकडुन संदेश प्राप्त होतो.
ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविणे हे नौका मालक तसेच मासेमारी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बंदर निहाय नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविण्याचे काम आहे. सदर उपकरण बसविण्यासाठी मच्छिमार संस्था व नौका धारकांनी सहकार्य करावे असे आव्हाहन श्री आनंद पालव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय , रत्नागिरी यांनी केले आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने श्री राजेश कांबळे , जिल्हा व्यवस्थापक, रत्नागिरी यांनी रिलायन्स फाउंडेशन मासेमारांसाठी दररोज सागरी हवामानाची माहिती , वादळाची पूर सूचना, मस्त्यव्यवसाय विभागाच्या योजना, ट्रान्सपॉन्डर उपकरणांची जनजागृतीपर माहिती इत्यादी माहिती ध्वनी संदेश व व्हाट्सअँप च्या माध्यमातून मासेमानपर्यँत तात्काळ पोहचवण्याचे काम करत आहे, तसेच मासेमारांना सागरी सुरक्षा , मासेमारीसाठी उपयुक्त उपकरणांची प्रशिक्षण देत आहे.
सदर कार्यक्रमासाठी श्री. . वि. ऋ. शिंदे सुरक्षा पर्यवेक्षक, गुहागर , श्री. राजन शिंदे , श्री. अंकेश चिंगडे , श्री. परिमल तोडणकर सुरक्षा रक्षक व सागरमित्र
व रिलायन्स फाउंडेशनचे गौरव जाधव , पडवे सहकारी मच्छीमार संस्थेचे चेअरमन,,मुदस्सर खले उपस्थित होते