*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हिमालय…*
हिमालय गिरीराज
माय भारतीची शान
हिमशिखरे विशाल
आहे पसारून छान ।।१।।
कसा रूबाब तयाचा
जगी बनलाय वाण
माय भारतभूमीचे
सदा करीतो रक्षण ।।२।।
हिम-शिखरे अद्भुत
कलाकृती निसर्गाची
शोभे मुकूट रूपेरी
भारताच्या शिरपेची ।।३।।
नद्या अनेक तयांचे
गिरी उगमाचे स्थान
जाळे नद्यांचे विणून
करी जीवन प्रदान ।।४।।
लावी ओढ हिमालय
कसा गिर्यारोहकांस
सर करावया शृंगे
येती महिला पुरूष ।।५।।
हिमालयाच्या कुशीत
वसे दिव्य तीर्थस्थळे
धर्मग्रंथी हो तयांचा
महत्ता उल्लेख मिळे ।।६।।
✍️शशांक दिनकरराव देशमुख©®
चांदुरबाजार, जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो. क्र. ९९२३५३६३२५