You are currently viewing मळगावात १ जानेवारी रोजी “संत कबीर” नाट्यप्रयोग

मळगावात १ जानेवारी रोजी “संत कबीर” नाट्यप्रयोग

मळगावात १ जानेवारी रोजी “संत कबीर” नाट्यप्रयोग

सावंतवाडी

भिल्लवाडी गृप मळगाव आयोजित सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दशावतार कलाकार नितिन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ यांचा भव्य-दिव्य असा राम भक्तीवर आधारित दर्जेदार पौराणिक अध्यात्मिक ट्रिक्सीन युक्त नाट्यप्रयोग *”भक्त शिरोमणी संत कबीर”* चे आयोजन १ जानेवारी २०२५ रोजी राञौ ठिक ९ वाजता मळगाव येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे.

या नाट्यप्रयोगात श्री.नितिन आसयेकर सोबत दीप निर्गुण, देवेश कुडव, बंड्या परब, किरण नाईक, रमेश खोत, रावजी तारी, गुरु वराडकर, रुपेश माने हे कलाकार आपली कला सादर करणार, तसेच त्यांना हार्मोनियम सिद्धेश राऊळ, पखवाजवादक प्रकाश मेस्त्री, झांजवादक कुणाल परब हे साथ देणार आहेत.

या ट्रिक्सीन युक्त नाट्यप्रयोगाचा नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन भिल्लवाडी गृप, मळगाव चे अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा