*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी प्रा.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
पाहिले ना मी चंद्र सूर्य तारे
इतुक्यात राजा झोपलास का रे ?
।। ध्रु ।।
सतार अजुनी अबोल आहे
अंगावरी तिच्या खोळं आहे
उघडना गवसणी आत चंद्र तारे
।। 1 ।।
लाव षड्ज तो तार सप्तकात
बहरू दे सतार उच्च आरोहात
अबोलीचे बोल जरा ऐक नारे
।। 2 ।।
पणतीमध्ये पेटू दे ती वात
भिजू दे सर्वांग तुझ्या प्रेमात
क्षितीवरती सुटू दे गार वारे
।। 3 ।।
छेडल्या तारात ठहराव घे रे
गडबड नको अवरोहात कारे
चमकू दे गगनी शुक्र अन तारे
।। 4 ।।
दरबारी रागात गुलाबी ढंगात
फुलू दे मोगरा महिरपी कंसात
मदन मंजिरीचा सोड आता बाण रे
।। 5 ।।
प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
नसलापुर
कॉपी राईट 22 नोव्हेंबर 23