*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्रॅक झालो*
प्रेमामुळे तुझ्या मी हलकेच हॅक झालो
जादू तू काय केली सगळाच क्रॅक झालो ।।
मजला लुभावण्याचे होते तुझेच चाळे
तू मुक्त वागली मी आख्खाच पॅक झालो ।।
बागेतल्या फुलांना अन् पुस्तका तुझ्या मी
सांभाळण्यास वस्तू तेंव्हाच रॅक झालो ।।
खर्चीक फार होती नेत्रात नोट होती
कळण्याआधीच तेंव्हा पैशात लॅक झालो ।।
काॅलेजच्या स्टडीत नेहमीच फर्स्ट होतो
तू लावलेस नादी जोरात बॅक झालो ।।
होतीच सुंदरा तू वाटे मला शबाना
माझीच अप्सरा तू समजून जॅक झालो ।।
मी मोहराच होतो तुज वाचवावयाला
जेंव्हा मला कळाले पुरताच व्हॅक झालो ।।
व्हॅक—पागल/सनकी
यात क़ाफ़िया इंग्रजी शब्दांचा घेतला आहे.
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाशिक , ९८२३२१९५५०