You are currently viewing कॅमेर्‍यासोबतच…जगणं माझं…!!

कॅमेर्‍यासोबतच…जगणं माझं…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतच…जगणं माझं…!!*

 

प्रेमांत मी तुझ्या….

डोळ्यांत माझ्या तू मावत नाही

आभासी कां असेना

तुझ्याशिवाय एक क्षणही जात नाही

 

सवयीचा रात्रीचा अंधारही..तुझ्यामुळे

माझ्याकरता रंगीबेरंगी वाटायला लागला

अजाणतेने माझेही डोळे उगाच मिटले

नजर तुझी…तू माझ्या चेहर्‍यावर ठेवून गेला

 

वाढत्या वयातही मला तू जपलसं

सारं जग सुंदर दिसायला लागलं

आता मरणाला मी घाबरत नाही

तूचं माझं ..प्रतिबिंब सुंदर दाखवलं

..

एका ॠतुतून …दुस-या ॠतुत

आजवर मी गुलाबांसोबत जात होतो

तुझ्यामुळे जगण्याचा प्रवासात नव्याने अर्थ सापडला….तुझ्यामुळेच घरोघरी

मी माझे गुलाब जगभर पोहोचवतो

 

आता कसे सांगू तुला….गुलाबांना..

एकटेपणाचं कधीकधी खूप ओझं येतं

कॅमेर्‍यासोबतच …जगणं माझ्यावर

जन्मजन्मांतरीचं गुलाबी ॠण असतं

 

तू नाहीस तर माझ्याकडे काहीच उरत नाही….तुझ्याशिवाय..गुलाबांसोबत

माझ्यातलं हिरवेपण जपायला कुणी उरलं नाही….!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा